आरती भुवनसुंदराची

आरती भुवनसुंदराची — कृष्ण आरती

आरती भुवनसुंदराची l इंदिरा वरा मुकुंदाची llध्रु॰ll

पद्मसम पादयुग्मरंगा l ओवाळणी होती भृंगा l

नखमणि स्रवताहे गंगा l जे का त्रिविध तापभंगा llचालll

वर्तुळ गुल्फ भ्राजमाने l किंकीणी क्वणित नाद घणघणित l

वांकीवर झुणित, नूपुरे झनन मंजिराची l झनन ध्वनी मंजिराची ll१ll

पीतपट हाटक तप्त वर्णी l कांची नितंब सुस्थानी l

नाभिची अगाध हो करणी l विश्वजनकाची जे जननी llचाल ll

त्रिवली ललित उदरशोभा l कंबुगळा माळ, विलंबित झळाळ l

कौस्तुभ सरळ बाहु श्रीवत्सतरळ मणिमरळ कंकणाची l

प्रीति बहु जडित कंकणाची ll२ll आरती…

इंदुसम आस्य कुंदरदना l अधरारुणार्क बिंबवदना l

पाहता भ्रांति पडे मदना l सजल मेघाब्धि दैत्यदमना llचालll

झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली l

मयुर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित l

कृष्णकस्तुरीची अक्षता काळी कस्तुरीची ll३ll आरती…

कल्पद्रुमातळी मूर्ती l सौदामिनी कोटीदीप्ती l

गोपी गोपवलय भवती l त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती llचालll

मंजुळ मधुर मुरलीनादे l चकित गंधर्व चकित अप्सरा l

सुरगिरीवरा, कर्पुराधर रतीने प्रेमयुक्त साची l

आरती ओवाळित साची ll४ll आरती…

वृन्दावनीचिये हरणी l सखे गे कृष्ण माय बहिणी l

श्रमलो भवाब्धिचे फिरणी lआता मज ठाव देई चरणी llचालll

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका l नमितो चरण शरण मी करुणा येऊ दे l

विशाळपाणि कृष्ण नेणते, बाळ आपुले राखि लाज याची l

दयानिधे राखि लाज याची ll५ll आरती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!