जयजयाजी मदनांतक गौरीशंकरा

जयजयाजी मदनांतक गौरीशंकरा
पंचारती करितो तुज हे महेश्वरा ।।ध्रु॰।।

व्याघ्रांबर अंगी तू नित्य सेवेसी ।
रुंडमाळ कंठी असे मस्तकी शशि ।
गिरिजा तव वामांकी शोभते तशी ।
भस्मप्रिया भूतपते इंदुशेखरा ।। १ ।। जय…

बहु दुर्जन त्रिपुर दैत्य प्रबल जाहला ।
हरि विधीसह विबुध पिडूनी त्रास दिधला ।
तेव्हां ते अति भावे स्तविती मग तुला ।
त्रिपुरासुर वधुनि सुखी करिसी सुरवरा ।।२।। जय..

एकवीस स्वर्गीहुनी उंची तव अती ।
सर्वेशा दाता तू सद्गतीप्रती ।
तव लीला वर्णनासी अल्प मम मती ।
विठ्ठलसुत विनवीतसे रक्षी किंकरा ।।३।। जय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!