गृहप्रवेश गणेशपूजन कलश स्थापन यादी
— गृहप्रवेश गणेशपूजन कलश स्थापन — साहीत्य यादी list [printerfriendly]
चौरंग – पाट देवाचा फोटो ( गणपती / देवी / इत्यादी )
गणपती मूर्ती ( नसल्यास फोटो आहेच ) , घंटी
हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे – फुलपात्र
पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर सर्व एकत्र ) ..
सुपाऱ्या १० – १२ , लाल / पिवळे / हिरवे वस्त्र किंवा ब्लाउजपिस
एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र — सर्व घरात आधीच शिंपडने .
विड्याची पाने 15
5 हळकुंड , 5 अक्रोड , 5 खारीक , 5 लवंग , 5 वेलची
15 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 – 3 ,
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
प्रसाद म्हणून पेढे बर्फी मोदक वैगेरे
देवासाठी —> एक पंचा किंवा उपरणे किंवा एक नॅपकिन ( नवीन )
गुरुजींसाठी इच्छा – मानस असल्यास वस्त्र व शिधा दान
5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , थोडा गूळ , थोडी खडीसाखर
2 तांब्या / पितळेचे कलश पाण्याने भरून ठेवणे , कलशामध्ये आंब्याची पाने किंवा डहाळी ,
2 ताम्हण
थोडे गहू / तांदूळ
दान म्हणून 11 किंवा 9 तरी धान्ये प्रत्येकी 125 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर )
दूध ओतू जाऊ देण्यासाठी म्हणून – गॅस किंवा स्टोव्ह , एक छोटे पातेले – टोप , अर्धा लिटर दूध ,
गृहप्रवेश साठी एक कलश किंवा कळशी ,
दरवाजावर हळद – कुंकू – अष्टगंध वैगेरे एकत्र करून स्वस्तिक – शुभ लाभ – श्री – ऊँ वैगेरे काढावे किंवा तसे स्टिकर – टाईल्स वैगेरे लावावे
घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ..
हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळस दुर्वा बेल वैगेरे थोडेसेच निवडून ठेवावीत.
पूजेच्या दिवशी पूजा होई पर्यंत उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल ..
पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा …
पूजेला बसणाऱ्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..
या व्यतिरिक्त चार पाच वाट्या , तीन चार छोटी मोठी ताटे – थाळी – डिश इत्यादी , तीन चार फुलपात्र ग्लास , 4 – 5 चमचे , तीन चार छोटे मोठे भांडी पातेले , हात पुसायला – फरशी / भांडे पुसायला फडके डस्टर वैगेरे असे साहित्य लागण्याची शक्यता आहे , तर ते तयार असू द्यावे..
————————————————————————————————————————–
महत्वाचे — या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद …