श्राद्ध साहित्य यादी

बारानंतर एक ते दीड तासापर्यंत श्राद्ध करावे. श्राद्ध हे शास्त्रानुसार अपरान्ह काळात करावे , अपरान्ह काळात असलेल्या तिथीला करावे. म्हणजे सुरू जरी दहा अकरा वाजता झाले तरी मुख्य कर्म ग्रास वगैरे हे अपरान्ह काळात व्हायला हवे असा प्रयत्न असावा . सध्या अंतर – प्रवास – गुरुजींची वेळ यानुसार वेळ मागे पुढे झाली तरी दोष मानू नये , कर्म नीट व्यवस्थित होतेय ना हा प्रयत्न विचार असावा.

श्राद्धसाहित्य यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

श्राद्धसाहित्य यादी पर्याय 2

श्राद्धाला लागणारी तयारी –

पांढरे चंदन उगाळून , पांढरी सुवासिक फुले, तुळस, स्वच्छ काळे तीळ , तीनचार ताम्हणे , तांबे ३ , पळ्या ३ , पाट दोन तीन , गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी व द्रोण , केळीची पाने. तसेच यव ( यव / जव म्हणजे टरफलासहित गहू ) . सुपार्‍या , नारळ (जलयुक्त ), धूप ( अगरबत्ती ) , दीप तेलाचा – तुपाचा , विड्याची देठासहित पाने , शक्य झाल्यास काही विडे बनवून ( गोविंद विडे ), कापुर, जानवी जोड, काडेपेटी, पांढरी लोकर, वस्त्र धोतर , पंचा / उपरणे , शर्टपीस , शाल , ( पलंगपोस , चादर वगैरे इच्छित असल्यास ) भस्म , मध , सुती / लोकरीची आसने , पाट , भांडी पातेले ३ , सुटे पैसे , ( शक्यतो स्टीलचे ताट वाटी न वापरण्याचा प्रयत्न असावा ).

शिधा साहित्य – गव्हाचे पीठ (अर्धा किलो), तांदूळ (पावकिलो), हरबरा डाळ (पाव किलो), तुरडाळ (पाव किलो), गुळ (पाव किलो), तुप (१०० ग्रॅम), लाल भोपळा साधारण (१०० ग्रॅम), २ बटाटे, ५-६ मिरच्या, दक्षिणा. या शिध्यावर तुळशीपत्र ठेवून

पांढरी सुवासिक फुले –> मोगरा, जाई-जुई, सोनटक्का , दुहेरी तगर, कमळे लाल सोडून, अगस्तीची फुले, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुळ, सुरंगी वगैरे. तुळस, माका ( भृंगराज ) , अगस्तीची पाने , दुर्वा

श्राद्धाचे जेवण –>

वरण, भात, तांदळाची खीर, कढी-भजी टाकून, पुर्‍या, पाटवडी (डाळीच्या पिठाच्या वड्या), पाटवड्याची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, हरभरा डाळीचे वडे, भजी, घारगे (गूळ घालून केलेल्या पुर्‍या) अळुवडी
भाज्या – मेथी, कारले, गवार (अख्खी), भेंडी, लाल भोपळा.
कोशिंबीर – पेरू, केळी, डाळींब, सफरचंद, काकडी या फळांची
लिंबू, आल्याचा तुकडा (काही पदार्थ राहिले असल्यास सर्व ‘आले’ या अर्थी)
शक्यतो पदार्थात कांदा, लसूण वापरू नये.
तारतम्याने भाज्यांच्या अभावी कडधान्ये चालतात.

संपूर्ण लक्ष गुरुजींकडे व कर्माकडे असावे. शक्यतो धोतर – पंचा वगैरे नेसावे .

महत्वाचे —

या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे..

धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!