श्री धन्वंतरी आरती

 श्री धन्वंतरी आरती 

कमलनयन श्यामवर्ण पितांबर साजे |
मनमोहन वस्त्राने आदिदेव विलसे |
शंखचक्र जलौका अमृतघट हाती |
चतुर्भुजानी अवघ्या दु:खाला पळवी||
जय देव जय देव धन्वंतरी देवा |
सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || १ ||

देवांनी दैत्यांनी मंथन ते केले |
त्यातुन अमृत कलशा घेवुनिया आले |
भय दु:ख तरण्या जरा मृत्यू हरण्या |
सकळांना त्यांचे संजीवन झाले ||
जय देव जय देव धन्वंतरी देवा |
सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || २ ||

शास्त्रांचे परिशिलन अनुभव कर्माचा |
बुध्दिने तर्काने तत्पर ती सेवा |
शुचिर्दक्ष सत्यधर्म संयत औदार्या |
श्रीकांता सह सा-या आशीर्वच द्यावा ||
जय देव जय देव धन्वंतरी देवा |
सकळ जनांना द्यावा आरोग्य ठेवा || ३ ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!