साईबाबा आरती2

घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।
करुं साईसी आरती , माझ्या बाबांसी आरती ।।

उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।। सांई रमाधव ।। ओं बाबा रमाधव ।।

करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।। साईंचें हें ध्यान , माझ्या बाबांचे हें ध्यान ।।

कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं । साई तुझें पायीं ।। जडो चित्त तुझे ठायीं ।।

घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।
करुं साईसी आरती , माझ्या बाबांसी आरती ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!