उदक शान्ति पूजा सामान लिस्ट

— उदक शान्ति पूजा सामान लिस्ट —

हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध , अबीर – बुक्का , गुलाल

समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी

अगरबत्ती , धूप  , कापुर

पळी भांडे – फुलपात्र

घरातील गणपती मूर्ती – तांबे पितळ पंचधातु इत्यादीची ( नसल्यास फोटो / नारळ / सुपारी ) , व शंख , घंटी जे असेल ते

पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर ) ..

सुपाऱ्या 21 , लाल – पिवळे – हिरवे वस्त्र ब्लाउजपिस

एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )

घरातील फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी

गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 25

11 हळकुंड , 11 अक्रोड , 11 खारीक , 21 लवंग , 21 वेलची , मिक्स सुकामेवा ड्रायफ्रूट 

21 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे  कॉइन्स ) , 10 रू च्या 05 नोटा , 50 च्या 4 नोटा

वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा  , गजरे व वेण्या 2 – 3 ,

बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे

हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल

हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी )  आणि जानवे जोड 3

एक दोन शेणी ( गोवरी ) व गुग्गुळ वैगेरे धूप व कापुर

देवासाठी —> एक पंचा किंवा  उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ( नवीन )

देवाला गुरुजींना दान म्हणून धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , आणि एक् साडी ( दान म्हणून , जमल्यास , कंपल्सरी नाही .. दोन्ही पैकी एक असले तरी हरकत नाही )

5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर ,

250 ग्राम पेढे , तसेच नंतर वाटीभर भात बिन मिठाचा ,

3 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण

सव्वा किलो गहू , सव्वा किलो बारीक तांदूळ 

नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात  (  –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर ) शक्य असल्यास जमल्यास )

देवाच्या तसेच आपल्या पूर्वजांच्या फोटोला हार घालणे ..
जर एखाद्याच्या मृत्यूनंतरची उदकशांती  असल्यास त्या मृत व्यक्तीचा फोटो .. तसेच त्या व्यक्ती प्रित्यर्थ काही वस्तू – साहित्य वगैरे दान देणे असल्यास ते साहित्य ..

घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे , .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा  )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..

———— ———– ———– ——— ———
 ———–  विशेष सूचना ———

या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा /  पद्धत रीती रिवाज या प्रमाणे  कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
या याद्या सिलेक्ट करून कॉपी पेस्ट / शेअर होतात .. हवा तो बदल करून फॉरवर्ड करू शकतात.

धन्यवाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!