विठ्ठला मायबापा आरती

विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविध तापा ।
संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥

बाळपणीं नाठविले ॥ व्यर्थ तारुण्य गेलें ॥
जरा हे दु:ख मोठे ॥ पुढे ठाकुनि आले ॥ १ ॥
विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविध तापा ।
संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥

भक्तीचा लेश कांही ॥ सत्यमागम नाही ॥
परिणामीं काय आतां ॥ शरण आलों तुझें पायी ॥ २ ॥
विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविध तापा ।
संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥

हरी हरी माझी भ्रांती ॥ म्हणुनी आलो काकूळती ॥
कृपाळुबा जगन्नाथा ॥ तारी गंगाधरसूता ॥ ३ ॥
विठ्ठला मायबापा । वारीं त्रिविध तापा ।
संसारी त्रासलो मी ॥ वय लागलें मापा ॥ धृ. ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!