आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरी 1

ll आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरीची 1 ll

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II धृ II

भाद्रपद शुद्ध सप्तमी आवाहन करिती,
मनी जन आतूर होऊनी स्वागत तव करिती,
अनुराधा नक्षत्री आगमन हे असती,
तीन दिन उत्सवी मनी आनंदा भरती..

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II १ II

दुजे दिनी प्रभात समयी पाहुणचार करिती,
आरंभूनी तव पूजा फराळ अर्पिती,
जेष्ठा नक्षत्री मग महापूजा करिती,
नैवेद्य अर्पूनी गाऊ तव आरती..

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II २ II

जेष्ठा कनिष्ठा गौरी आसनी स्थिर झाली ,
पिलवंडा सहित ही प्रेमे सुतविली,
विविध पुष्पे वस्त्रमाळ हे भूषण,
आघाडा दुर्वा ऐसे अन्य आभूषण.

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II ३ II

तिसरे दिवशी मुळ नक्षत्री पूजा,
खिर पोळी नैवेद्य अर्पूया गिरीजा,
गाऊनी आरती करूनी निर्माल्य गाठी,
लक्ष्मी रूपे पोवती घालिती मग कंठी..

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II ४ II

ऐसा उत्सव जेथे होतो प्रति वर्षी,
परिवारासहित ही पूजा अतिहर्षी,
सुवासिनी मग कुंकुमार्चन करिती ,
कथितो संजय सुखाचे योजन हेची..

जय देवी जय देवी महालक्ष्मी माता
जेष्ठा कनिष्ठा गौरी अंबा जगत्राता II ५ II

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!