जेष्ठा-कनिष्ठा गौरी आरती 2
ll आरती जेष्ठा-कनिष्ठा गौरीची 2 ll
जय देवी जय देवी महालक्ष्मी माते
सुख समृद्धी घेवूनी यावे मम गृहाते ||
जेष्ठा कनिष्ठा रुपे भाद्रपद मासी
अनुराधा नक्षत्रावर येई माहेराशी
लेवूनी महावस्त्र जरभरीत खाशी
कुंकूम पावले शोभे माझे अंगणाशी ||
जय देवी जय देवी महालक्ष्मी माते
सुख समृद्धी घेवूनी यावे मम गृहाते ||
जेष्ठ शुभ नक्षत्रे पावन पर्वासी
षोडश शाक नैवेद्य फुलोरा तुजशी
सौभाग्य रक्षणे अर्पीले पोवत्याशी
मुखी तांबुले आली शोभा वदनाशी ||
जय देवी जय देवी महालक्ष्मी माते
सुख समृद्धी घेवूनी यावे मम गृहाते ||
मुळ नक्षत्र जरी काळ गणनेशी
परी वास तुझा राहो आम्हासी
सुखदायि वरदायि महालक्ष्मी ऐसी
विष्णुकमलसुत सदैव नत त्या पदासी ||
जय देवी जय देवी महालक्ष्मी माते
सुख समृद्धी घेवूनी यावे मम गृहाते ||