भीमा शंकर आरती

ज्योतिर्लिंग भीमाशंकर आरती

आरती भीमाशंकरा ।
ज्योतिर्लिंग परात्परा ।
ओवाळीतो कर्पूर शिवगौरा॥१॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥

भक्ता सोडूनी बहु दूरा।
मंदीर तुझे दरीखोरा।
सत्व पाहशी खरोखरा॥२॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा॥धृ॥

भीमा निघुनी तुझे चरणी ।
पावन करिसी सर्व धरणी ।
करणी आहे तुझी न्यारी ॥३॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा ॥धृ॥

गगना भेदा तुझे शिखर ।
पाहता पाप ताप हार ।
सन्मुखा उभा नंदिश्वर ॥४॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा ॥धृ॥

ऐका आरती करितो राया ।
शोक नाशक शिवराया ।
भाकिती शंभू गौरीवरा ॥५॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा ॥धृ॥

पंचारति करितो राया ।
पंचमुखी शंभूराया ।
पंच तत्व निर्विकारा ॥६॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा ॥धृ॥

भू कैलास खरोखरा ।
कमलजा देवी अवतारा ।
करितो प्रभू नमस्कार ॥७॥
भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा ॥धृ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!