श्रीमत् सद्गुरूस्वामी जयजय गणराया

श्री गजानन महाराज आरती १

श्रीमत् सद्गुरू स्वामी जय जय गणराया ।
आपण अवतरला जगि जडजिव ताराया ॥ धृ०॥

ब्रह्म सनातन जे का ते तू साक्षात
स्थावरजंगम भरला तुम्हि ओतप्रोत ।
तव लीलेचा लागे कवणा नच अंत
तुज वानाया नुरले शब्दहि भाषेत ॥ १॥

वरिवरि वेडेपण ते धारण जरि केले
परि सत्स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले ।
निर्जल गदडिसी जल ते आणविले
विग नभीचे काननि आज्ञेत वागविले ॥ २॥

दाम्भिक गोसाव्याते प्रत्यय दावून
ज्ञानिपणाचा त्याचा हरिला अभिमान ।
ओङ्कारेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन
नर्मदेचे भक्ता करवियले आपण ॥ ३॥

अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा
दुस्तरशा भवसागरि तरण्या दे हाता ।
वारी सदैव अमुची गुरूवर्या चिंता
दासगणूच्या ठेवा वरदं करा माथा ॥ ४॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!