गजानन महाराज आरती

श्री गजानन महाराज आरती

आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था ।
आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता ।
आरती सद्गुरू नाथा ।।धृ।।

दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा ।
पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था ।
आरती सद्गुरू नाथा ।।१।।

कविजन गुण गाता । थकियले समर्था ।
अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता ।
आरती सद्गुरू नाथा ।।२।।

विनंती भगवंता । तारी रामात्मज आता ।
आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता।
आरती सद्गुरू नाथा ।।३।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!