जय आरती पार्वतिकुमरा

गणपतीची आरती १

जय जय आरती पार्वतिकुमारा गणपती ओवाळूं ।

पंचही प्राणांच्या कर्पूरवाती ज्ञाना़ग्रे जाळू ॥ धृ.॥

ओंकार प्रणवाक्षरी बीजापासूनि ध्वनि उठली । ते हे माया त्रिगुणात्मकचि सगुंणत्वा आली ॥जय.॥१॥

पंचभूतात्मक व्यापक एकचि घटक तुं जैसा। दृष्टीगोचर नव्हसी कोणा गूळ गोडी तैसा ॥जय.॥२॥

निगुण ज्योति सगुणा आली पुंडलिकासाठी । विटेवर शोभे कटिकर उभा भीमेचे कांठी ॥ जय.॥ ३॥

ऎसी मूर्ति नित्यनिरंतर ध्यानी जे धरिती ।

संकट त्यांचे दूर करी तूं श्रीमंगलमूर्ती ॥ जय.॥ ४॥

वायुतानें ह्र्दयिं ध्यायिली जसि राघवमुर्ती ।

तसि हनुमंता तुझिया पायीं देई सद्‌भक्ती ॥

जय जय आरती पार्वति कुमारा. ॥५॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!