जय देवी सप्तश्रुंंगा

सप्तश्रुंग देवी आरती

जय देवी सप्तश्रुंगा , अंबा गौतमी गंगा ,नटली ही बहुरंगा ,उटी शेंदूर अंगा ,जय देवी ॥

पूर्वामुख अंबे ध्यान , जरा वाकडी मान ,मार्कंडेय देई कान ,सप्तशतीचे पान , ऐके अंबा गिरी श्रुंगा ,अंबा गौतमी गंगा , नटली ही …. जय देवी ॥ 1 ॥

माये तुझा बहु थाट , देई सगुण भेट , प्रेमे पान्हा एक घोट , भावे भरले हे पोट , करु नको मन भंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही … जय देवी ॥ 2 ॥

महिशीपुत्र महीषासुर , दृष्ट कामे असुर , करी ढाल समशेर , क्रोधे उडवीले शीर , शिवशक्ति शिवगंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही … जय देवी ॥ 3 ॥

निवृत्ती हा राधासुत , अंबे आरती गात , अठराही तुझे हात , भक्ता अभय देत , चरणी कमल ही भुंगा , अंबा गौतमी गंगा , नटली ही … जय देवी ॥ 4 ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!