लक्ष्मी आरती

लक्ष्मी आरती 

आद्य स्थान तुझें करविरपुर माते ।
प्रसन्नवदनें वससी माये, मन रमते ॥
सुरवर किन्नर पूजिति ध्याती स्थिरचित्तें ।
महिमा न कळे तुझा, गाती भावार्थें ॥१॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
आरति करितां तूं हरिसी अवलक्ष्मी ॥ध्रु.॥

दक्षिणभागीं तूझ्या कालीचें स्थान ।
सरस्वतीचें सव्यभागीं तें ठाण ॥
तुझ्या सन्मुख शोभे गजवदन ।
काशीतुल्या महिमा गाती मुनिजन ॥२॥

महिषासुरनिर्दळण प्रथम केलेंसी ।
शुंभ रक्तबीज तेही वधिलेसी ॥
सर्वहि असुरां मर्दुनि स्वस्थ जाहलीसी ।
सुराधिकारीं इंद्रा तूं स्थापियलेंसी ॥३॥

भजन करितां तूझें मुक्ती पै देसी ।
इहलोकीं सुखभोग भक्तां ओपीसी ॥
जनार्दन वदला परमभावेंसी ।
वरदहस्त माथां ठेवी भक्तांसी ॥४॥

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!