नाग स्तोत्र सर्प सूक्त
ज्यांना जीवनात अनेक अडचणी सतत येतात , जन्मपत्रिके नुसार राहू – केतू – नाग दोष – सर्प दोष इत्यादी प्रकारचे अशुभ दोष असतील , ज्यांना सतत सर्प वैगेरे भीतीदायक स्वप्न पडत असेल त्यानी हे स्तोत्र नेहमी म्हणावे .. दर पंचमी ला , शिवरात्री ला व आश्लेषा नक्षत्र असताना शिवमंदिरात जाऊन नाग असलेल्या शिवलिंगवर अभिषेक – पूजा इत्यादी करून हे स्तोत्र मनोभावे 3 – 5 – 8 – 11 वेळ पठण – श्रवण केले असता सर्व दोष त्रास दूर होऊन शुभ फळ प्राप्त होते. अर्थात पूर्ण श्रद्धा विश्वास असायला हवा व त्याच बरोबर आपले दैनंदिन कर्म – प्रयत्न – कष्ट सुद्धा करायला हवे , कारण देव हा कष्ट / प्रयत्न करणाऱ्यांनाच् फळ देतो आयते बसणाऱ्यांना नाही.. इतरांनी सुद्धा हे स्तोत्र पठण केल्यास उत्तम..
कालसर्प दोष – नाग दोष – आश्लेषा नक्षत्र – असणाऱ्यांनी तर खालील स्तोत्र मंत्र पैकी निदान काहीतरी एक तरी जरूर जप / पठण करावे ..
—— ——— ——— ——– ——– ——- —-
नाग गायत्री / सर्प गायत्री मंत्र —
ऊँ नवकुलाय विद्महे विषदन्ताय धीमहि । तन्नः सर्प प्रचोदयात् ।।
——– ———– ———— ———— ———–
नव नाग स्तोत्र
हे नवनाग स्तोत्र पठण केल्याने सर्प – नाग देवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो .. नेहमी पठण केल्याने सर्प दोष दूर होतात , जन्मकुंडली मधील राहू केतू आदी अशुभ असतील किंवा सर्पदोष असेल तर त्याचे त्रास कमी होतात .. निदान दर पंचमी ला तरी याचे पठण करावे . 1 / 3 / 5 / 8 / 11 / 21 / 51 / 108 वेळा असे याचे पठण करू शकतात ..
अनंतम् वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं धार्तराष्ट्रं तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं
सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत
ll इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं ll