नागदोष सर्पदोष उपाय

स्वप्नात साप नाग येणे

१) नागाचे अशुभदर्शक स्वप्नं पडल्यावर दचकून जाग आली, भिती वाटली की पुढील मंत्र लगेचच किंवा सकाळचे नित्य प्रातर्विधी झाल्यावर देवासमोर ११ वेळा म्हणून देवाला अशुभ न होऊ देण्याची प्रार्थना विनंती करावी . म्हणजे स्वप्नांचे अशुभ फळ नष्ट होते .

वाराणस्यां दक्षिणे भागे कुक्कुटो नाम वैद्विज: ।
तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्नः सुस्वप्नो भवेत ।।

२) सतत नाग किंवा सर्पाची भितीदायक व क्लेशकारक स्वप्ने पडत असतील तर पुढील स्तोत्र रोज रात्री “झोपण्याआधी” हातपाय धुवून बेडवर बसूनच म्हणावे व त्यानंतर झोपी जावे…या स्तोत्रात अनंत,वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नवनागांचे स्मरण केले आहे. ( ज्यांचे कुंडली जन्मपत्रिकेत सर्पदोष नागदोष असेल त्यांनी तसेच राहु केतु दूषित असल्यास अशुभ असल्यास तसेच जन्म नक्षत्र भरणी असेल त्यांनी सुद्धा हे स्तोत्र नित्य म्हणावे )

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं||
सायंकाले पठेनित्यं प्रात:काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत||

3) ज्या रात्री नाग/सर्प स्वप्नात येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणताहि वार असेल तरी त्या दिवशी एकवेळ उपवास करुन (उपवास झेपत नसेल तर कांदालसुण विरहित शाकाहारी भोजन करावे) शंकराचे देवळात जाऊन पिंडीवर पंचामृत अभिषेक करुन, ११ बेलाची पाने वहावीत व दोषनिवारणाची प्रार्थना करुन घरी परत यावे (देवळातून घरी सरळ परत यावे, इतर कुठेही वळू नये यामागे गुढ संकेत आहे) घरी परत आल्यावर थोडा वेळ थांबून मग इतरत्र कुठे जायचे असेल तर जावे. नाग किंवा सर्प ज्या रात्री स्वप्नात दिसेल तर दुसऱ्या दिवशी उठून लगेच ते स्वप्न इतरांना न सांगता अगोदर सकाळी उठल्या उठल्या मुखमार्जन झाल्यावर देवासमोर उभे राहून हात जोडून पुढील प्रार्थना करावी *”ॐ नम: शिवाय* आज रात्री पडलेल्या अशुभ स्वप्नाने मी भयभित झालो आहे/झाले आहे. तर या स्वप्नांतील अशुभत्वाचा नाश होऊन या स्वप्नाची फक्त शुभफले मला मिळावीत ही प्रार्थना करत आहे” असे म्हणावे त्यानंतर कोणाला स्वप्न सांगायचे असेल तर सांगावे.

४) सर्प/नाग स्वप्नात येत असतील तर तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार गोरगरीबांना अन्नदान करावे, नारायणसेवा करावी. अंध व्यक्तींना औषधोपचारांची मदत करावी आणि जुन्या शिवालयांना जीर्णोध्दारासाठी आर्थिक मदत करावी.

५) तुमच्या हातून कळत नकळतपणे जर सर्पहत्या झाली असेल तर आधिदैविक दोष निर्माण होतात. त्यासाठी वर्षातून किमान एकदा शास्त्रोक्त पध्दतीने लघुरुद्र हा विधी करवून घ्यावा. हा विधी कोणत्याही महिन्यात करायला हरकत नाही. किंवा ब्राह्मण गुरुजिंकडून घरी विधिवत महिम्न किंवा रूद्र अभिषेक तरी करून घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!