नवरात्री 2020

हरिऊँ नमस्कार

नवरात्र मधील काही शंका व त्यावरील उत्तर —

● कुमारी – सुहासिनी पूजन केव्हा / कधी / किती ? —
पौर्णिमेपर्यंत कधीही करू शकतात ..
पूजन करण्याआधी देवीपूजा , देवीस्तोत्र म्हणावे , देवीला प्रार्थना करावी , देवीसाठी सुद्धा एक सेट ( कुमारीकाना / सुहासिनीना जे देणार आहे ते ) काढून ठेवावा ,
नंतर कुमारिका / सुहासिनी पूजन करावे ..
देवीसमोर काढलेला सेट स्वतः आशीर्वाद म्हणून वापरावा किंवा देवीच्या मंदिरात द्यावा किंवा एखाद्या गुरुजींना द्यावा ..
सध्याच्या आपदा काळात कुमारी – सुहासिनी पूजन केव्हाही (सकाळ दुपार संध्या) – कधीही ( घटस्थापने पासून अगदी दसरा – पौर्णिमेपर्यंत ) केले तरी दोष नाही , तसेच कितीही संख्या असली तरी दोष नाही , वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कुमारिका सुहासिनी ( आज दोन – उद्या चार – परवा तीन वगैरे ) आल्या तरी हरकत नाही ..

● यंदा 2020 नवरात्र अष्टमी चे विशेष पूजन होम उपवास कधी ?–

मुंबई , ठाणे , कल्याण , अलिबाग , श्रीवर्धन , गुजरात , उदयपूर , जोधपूर , अजमेर , बिकानेर , चंदिगढ सोडून बाकीचा पंजाब भाग या सर्व प्रदेशांमध्ये अष्टमी चा उपवास 23 ला शुक्रवारी ..
आणि
महाराष्ट्रात वर 23 ला सांगितलेले गावे सोडून उर्वरित इतर भागात , तसेच गोवा , कर्नाटक , आंध्र , तामिळनाडू , जयपूर , कोटा , चंदिगढ , हरियाणा , दिल्ली , आग्रा , उत्तरप्रदेश , पश्चिम बंगाल या सर्व भागांमध्ये अष्टमी उपवास 24 ला शनिवारी.

अष्टमी चे होम हवन संध्याकाळी होणार असेल तर शुक्रवारी केले तरी चालेल ,
शनिवारी केव्हाही चालेल ..

● उत्थापन —>
आपापल्या रीती परंपराप्रमाणे काही ठिकाणी नवमीला संध्याकाळी तर काही ठिकाणी दशमी दसरा ला सकाळी – दुपारी …

घटस्थापना नंतर देवी / घट स्थापन केले असल्यास देवीला – घटाला रोज वाहिलेले फुले निर्माल्य वगैरे काढावे व नवीन फुले -हार – गजरा वगैरे अर्पण करणे .. नवरात्र चीमाळ जी रोज एक वाढवतो ती मात्र राहू देणे .. तसेच रोज नेवैद्य म्हणून फळ – सुकामेवा वगैरे ठेवल्यास उत्तम ..
इतर देवांची नेहमीप्रमाणे अभिषेक पूजा वगैरे करणे ..

जगदंब उदयोस्तु .. उदयोस्तु … उदयोस्तु

आपलाच धर्मसेवक –
श्री श्याम जोशी गुरुजी …
टिटवाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!