कार्यालय गणेश पूजन

— कार्यालय गणेशपूजन कलश स्थापन —

चौरंग / पाट , देवाचा फोटो ( गणपती / देवी / इत्यादी )

घंटी ( असल्यास गणपती मूर्ती – कम्पल्सरी नाही )

हळद , कुंकू , चंदन / अष्टगंध

समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी

अगरबत्ती , धूप  , कापुर

पळी भांडे – फुलपात्र

पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर सर्व एकत्र )  ..

सुपाऱ्या 10 , लाल / पिवळे / हिरवे वस्त्र किंवा ब्लाउजपिस

एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )

देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी

गंगाजल , गोमूत्र — सर्व जागेत आधीच शिंपडने ..

विड्याची पाने 20

5 हळकुंड , 5 अक्रोड , 5 खारीक , 5 लवंग , 5 वेलची

15 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे  कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा

वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा  , गजरे व वेण्या 2 – 3 ,

बसण्यासाठी आसन किंवा धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे

हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल

हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी )  आणि जानवे जोड 3

प्रसाद म्हणून पेढे – बर्फी – मोदक वैगेरे

देवासाठी —> एक पंचा किंवा  उपरणे किंवा एक नॅपकिन ( नवीन )

गुरुजींसाठी इच्छा – मानस असल्यास वस्त्र दान व शिधा धान्य दान

दक्षिणा — रुपये 2151/- फक्त

5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , थोडा गूळ , थोडी खडीसाखर

2 तांब्या / पितळेचे कलश पाण्याने भरून ठेवणे , कलशामध्ये आंब्याची पाने किंवा डहाळी ,
2 ताम्हण

थोडे गहू / तांदूळ

शक्य असल्यास – इच्छा असल्यास  दान म्हणून  11 किंवा 9 तरी धान्ये प्रत्येकी 125 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात  (  –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर ) –> कम्पल्सरी नाही..

दरवाजावर स्वस्तिक – शुभ लाभ – श्री – ऊँ वैगेरे काढावे किंवा तसे स्टिकर – टाईल्स वैगेरे लावावे

जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी ,  देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ..
हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळस दुर्वा बेल वैगेरे थोडेसेच निवडून ठेवावीत.
पूजेच्या दिवशी पूजा होई पर्यंत उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल ..
काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा …
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा  )
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..

या व्यतिरिक्त चार पाच वाट्या किंवा द्रोण , दोन तीन ताटे  किंवा पत्रावळी  , चार पाच फुलपात्र ग्लास , 4 – 5  चमचे , दोन छोटे मोठे पातेले , हात पुसायला – फरशी भांडे पुसायला फडके डस्टर वैगेरे असे साहित्य लागण्याची शक्यता आहे , तर ते तयार असू द्यावे..


महत्वाचे या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद … 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!