पांडुरंग आरती

पांडुरंग आरती

ओवाळूं आरती माझ्या पंढरीराया,
माझ्या पंढरीराया।
सर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥

सर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ,
रूप राहिले अकळ ।
तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥

स्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार धरीं ॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥

भक्तांचा काजा कैसा रूपासी आला,
कैसा रूपासी आला ।
ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ३ ॥

आरती कैसी ओवाळीली, कैसी ओवाळीली ।
वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥

भावभक्तीबळें होसी कृपाळू देवा,
होसी कृपाळू देवा ॥
तुका म्हणे तुझ्या न कळता भावा ॥ ५ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!