सत्यनारायण साहित्य यादी

— श्रीसत्यनारायण पूजा सामान लिस्ट —

सत्यनारायण यादी डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध , अबीर बुक्का , गुलाल

समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस , गायीचे तूप व तिळाचे तेल दिव्यासाठी

अगरबत्ती , धूप , कापुर

पळी भांडे – फुलपात्र

घरातील गणपती व बाळकृष्ण मूर्ती – तांबे पितळ पंचधातु इत्यादीची ( घरात नसल्यास लग्नात आलेली )

शंख , घंटी

पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर ) व प्रसाद अपेक्षित व्यक्तींप्रमाणे ..

सुपाऱ्या 30 , लाल – पिवळे – हिरवे वस्त्र ब्लाउजपिस

एक स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )

घरातील देवाच्या फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी

गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 25

11 हळकुंड , 11 अक्रोड , 11 खारीक , 21 लवंग , 21 वेलची

21 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 02 नोटा

वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 – 3 ,

बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे

हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल

हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3

चौरंगाला 4 केळी / कर्दळी चे खांब बांधून तयार ठेवणे

देवासाठी —> एक पंचा किंवा उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ( नवीन )

लग्नाची पहिलीच पूजा असेल तर दान म्हणून धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , आणि एक् साडी ( दान म्हणून , जमल्यास , कंपल्सरी नाही .. दोन्ही पैकी एक असले तरी हरकत नाही )

5 फळे , 5 नारळ , 2 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर

2 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण

सव्वा किलो गहू , सव्वा किलो बारीक तांदूळ

नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर )

सत्यनारायणाचा फोटो , तो नसल्यास कोणत्याही विष्णूरूपाचा फोटो ( श्रीराम / श्रीकृष्ण / श्रीविठ्ठल / गजानन महाराज / स्वामी समर्थ इत्यादी ) , फोटोला हार घालुन तयार ठेवणे ..

घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे , चौरंगाला केळीचे किंवा कर्दळीचे खांब बांधून चौरंग तयार ठेवावा .. हळद , कुंकू वैगेरे वाट्यांमध्ये काढून ठेवावे .. तुळशीची निदान 108 तरी पाने निवडून ठेवावीत. मंजिरी सकट असल्यास उत्तमच.
अपेक्षित माणसांचा प्रसाद तयार करून ठेवावा ..
पूजेच्या दिवशी उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू , चहा कॉफी वेगेरे चालेल , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा )
लग्ना नंतरची पहीलीच पूजा असल्यास पूजा सुरु होण्या आधी नववधूची ओटी भरावी . तिला गजरा वैगेरे द्यावा ..
मोबाईल वैगेरे बंद ठेवावा किंवा दुसऱ्यांना द्यावा . सर्व लक्ष पूजेकडेच द्यावे ..

— — — — — — — — — — — — — — — — — — —

महत्वाचे — या सर्व पूजा – यज्ञ – साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत – रीती – रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी – हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे..

धन्यवाद ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!