साधी शान्ति हवन
— शांती हवन सामान लिस्ट —
हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध
समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस
अगरबत्ती , धूप , कापुर
पळी भांडे – फुलपात्र
घरातील गणपती मूर्ती – तांबे पितळ पंचधातु इत्यादीची
शंख , घंटी
पंचामृत अर्धा वाटी ( दूध + दही + तूप + मध + साखर )
सुपाऱ्या – 8 ते 10 छोट्या व 8 – 10 मोठया ( किंवा सर्वच मोठ्या सुपाऱ्या )
पाच सात पत्रावळी , 2 ते 3 मोठी ताटे ,
5 ते 7 वाट्या किंवा पत्रावळीचे द्रोण , 2 – 3 पळी / चमचे , रद्दी पेपर
एक दोन स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )
घरातील फोटोना हार , दरवाजाला हार तोरण आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने डहाळी
गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 30
21 हळकुंड , 21 अक्रोड , 21 खारीक , 21 लवंग , 21 वेलची
30 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे कॉइन्स ) , 10 रू च्या 05 नोटा , 50 च्या 3 नोटा , 100 च्या 3 नोटा
वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा , गजरे व वेण्या 2 – 3
बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे
हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले किंवा नवीन नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल
हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी ) आणि जानवे जोड 3
चौरंग व पाट मिळून टोटल तीन – चार
देवासाठी —> 2 – 3 ब्लॉउज पीस , एक पंचा – उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन , एक
धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , एक् साडी ( दान म्हणून )
5 फळे , 8 नारळ , 3 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर , थोडा मिक्स सुकामेवा
3 ते 4 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण
अडीच किलो गहू , चार किलो बारीक तांदूळ
नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात ( –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – ज्वारी – बाजरी – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर )
गायीचे तूप अर्धा – पाऊन किलो
काळे तीळ अर्धा – पाऊन किलो
शेणाच्या गोवऱ्या 3 – 4 शेण्या , हवना साठी इंधन म्हणून 2 – 3 किलो लाकडे , तसेच 6 – 7 समिधा बंडल
होम हवना साठी 10 विटा किंवा यज्ञपात्र हवन पात्र / हवन कुंड , आणि त्यात थोडी रेती / वाळू / माती लागेल.
घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ,
पूजेच्या दिवशी उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू वेगेरे आणावीत , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा )
–———– ———– ———– ——— ———
———– विशेष सूचना —–
या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या वैगेरे वैगेरे अशा तक्रार ना करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे..
या याद्या सिलेक्ट करून कॉपी पेस्ट / शेअर होतात .. हवा तो बदल करून फॉरवर्ड करू शकतात.
धन्यवाद …