साईनाथ आरती

ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।
पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।

निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली ।
सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं  ।।

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।।
।। ओंवाळूं  ।।

सप्तसागरी कैसा खेळ मांडीला ।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।।
।। ओंवाळूं ।।

ब्रहांडींची रचना कैसी दाखविली डोळां ।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।।
।। ओंवाळूं ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!