शुक्राङ्गारकबुधबृहस्पति चिंतन
शुक्राङ्गारकबुधबृहस्पति… विषयी चिंतन
हरिऊँ , श्री गणेशाय नमः ..
सर्व गुरुजनांना नम्र वंदन 🙏..
आताच एका प्रिय विद्वान व्यक्तीशी बोलताना त्याने सांगितले की एके समूहावर चर्चा चालू होती व अजूनही आहे की पुण्याहवाचन मध्ये
*” शुक्राङ्गारकबुधबृहस्पतिशनैश्चरराहुकेतु सोम सहिता आदित्या पुरोगा: सर्वे ग्रहा प्रियंताम् “* हे असे कसे ? कोणालाच काहीच समजत नाही , असाच क्रम का घेतला ? यात काय लॉजिक वापरले?? किंवा नंतरच्या कोणी काही चूक तर नाही ना केली वगैरे वगैरे ..
तर हे असे कसे , हे उत्तर त्याला समजवून सांगितले व त्याच्या स्नेहार्द विनंतीनुसार लिखाण करून मी हे पोस्ट करत आहे .. मी काही विद्वान नाही पण जे काही वाचले , चिंतन केले त्यानुसार .. माझी अल्पमतिचा विचार व माझ्या गुरूंचा आशिर्वाद…
तर वरील मन्त्रकरिका ही जीवाची किंवा कोणत्याही स्थितीचा जिवनक्रम / स्टेज ( stage ) दाखवत आहे .. प्राणीमात्रांमध्ये –
सर्वात प्रथम *शुक्र* ज्यामुळे हा जीव जन्माला येतो ,
नंतर *अंगारक* म्हणजेच शरीर , चयापचय , धष्ठपुष्टता इत्यादी इत्यादी..
मग नंतर *बुध* येतो बुद्धी घेऊन ..
मग मिळते ते ज्ञान *बृहस्पती* मुळे ..
त्यानंतर तो जीव जीवनामधील एकाग्रता – निर्धार – यम नियम – सुख दुःख साधायला ( मान्य करायला ) लागतो किंवा ते कळायला लागते *शनैश्चर* मुळे.. मग मात्र त्याचा सुरू होतो खेळ साध्य साधने – लक्ष्य गाठणे – संघर्ष ओढातान वगैरे वगैरे पाठशिवणीचा खेळ *राहुकेतु* सुरू होतो … मग मात्र त्याला *सोम* मनाचा निर्धार देतो , पूर्णत्व कडे नेण्यास गती देतो , चालायला लावतो .. आणि मग नंतर त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने तेज प्राप्त होते *आदित्य* सारखे .. तर असा हा जीवनक्रम ..
आणि यात अजूनही एक गोम आहे 😊😊
शुक्र व मंगळ
तसे बघायला गेलं तर
दोन्ही *काम* दाखवतात
आजही ज्योतिषात मंगल अशुभ असेल तर कामवासना विचित्र वैगेरे असे फलित लिहिलेले दिसेल तुम्हाला
पण येथे शुक्र हाच का आधी
तर शुक्राचा *काम* हा धर्म मान्य – समाज मान्य असा व उत्साह – प्रेमाने – प्रजनन वृद्धी या उदात्त हेतूने आहे
पण मंगळ ??
मंगळ च्या *कामात* वासना असते , हेतू उदात्त नसतो
तसेच बुध बृहस्पती
यात
बुध म्हणजे बुद्धी , व गुरू म्हणजे ज्ञान
पण ज्ञान असले तरी ते अंगीकार – ऍप्लिकेशन – एक्जीक्युट करण्यासाठी बुद्धी लागते
कसे व का ??
तर अनेक महापुरुष – संताना जन्मजात ज्ञान होतेच , पण तरी सुद्धा कोणी ना कोणी गुरू करून त्यांनी ते ज्ञान धारदार करण्यासाठी पहिले बुद्धी वापरली
😊 किंवा आपल्या हेतूंसाठी बुद्धिपूर्वक गुरू केला
व यामध्ये पण आपल्या ऋषींनी एक शब्द टाकून कोडे टाकले , व तो शब्द म्हणजे ” पुरोगा: “ या शब्दाचे अनेक अर्थ होतात .. पुरयते , पुर्ती , आरंभस्यांत: के , वगैरे वगैरे
म्हणजेच शुक्रा पासून पकडा किंवा आदित्य पासून , जीवनक्रम असाच असेल ..
समजा आपण आदित्यपासून जर घेतले ,
तर पहिले तेज स्थापित होईल ( आदित्य ) , मग जीव तयार होईल , त्याला मन , भावना ( सोम ) येतील .. अंधार उजेड – सुख दुःख संघर्ष असेल ( राहुकेतु ) .. मग नंतर शिकण्याची सुरुवात होईल – ज्ञान येईल ( बृहस्पती ) , ते ज्ञान कुठे वापरायचे ही बुद्धी येईल ( बुध ) , मग संघर्षासाठी शक्ती येईल , काम येईल ( अंगारक ) व नंतर सुख साधण्याची – भोग लालसेची सुरुवात होईल व पुन्हा नवीन जीवाची तयारी सुरू ( शुक्र ) ..
कुठूनही सुरुवात करा , जीवाचा असाच क्रम / अवस्था राहील .. मग बाल्यावस्था – कुमार – तरुण इत्यादी इत्यादी काहीही असो .. प्रत्येक वेळेस , प्रत्येक काळात असाच क्रमानुभव …
अगदी सर्वसंगपरित्याग करून संन्यास जरी घ्यायचा म्हंटला – साधक , योगी , तपस्वी व्हायचे म्हंटले तरी असाच अवस्था क्रम .. प्रथम *शुक्र* स्वस्थ बसू देणार नाही , सतत त्या आठवणी .. त्यामुळे येणारा उन्माद , द्वाडपणा , शारीरिक ऊर्जेची अस्वस्थता ( अंगारक ).. मग नंतर *बुध* बुद्धीला समजावून मार्गी लावून ज्ञानाकडे ( बृहस्पती ) कडे नेण्याचा प्रयत्न होईल , ज्ञान येईल .. मग एकाग्रता – यम नियम – निर्धार साधला जाईल ( शनैश्चर ) .. मग सिद्धी की मोक्ष हा खेळ सुरू होईल ( राहुकेतु ).. नंतर मनाची निश्चयावस्था ( सोम ) आणि मग ज्ञानाचा मोक्षाचा खरा प्रकाश ( आदित्य ) म्हणजेच साक्षात्कार..
असा हा क्रम ऋषींनी लावताना खूपच अध्यात्मिक व आताच्या आधुनिक काळातील विज्ञानाचा सुद्धा विचार केला आहे बरे .. गर्भावस्थेमध्ये सुद्धा असाच क्रम दिसेल तुम्हाला त्या गर्भाचा जन्म होई पर्यंत .. म्हणूनच वेद , वैदिक कर्मकांड हे अत्युच्च ज्ञान आहे व ते सुद्धा सायंटिफिक हे मी म्हणत असतो ते याचसाठी ..
इदं न मम .. 🙏🙏
लेखक @© श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा .. चैत्रकृष्णएकादशीभृगुवासरे शके१९४२
ता.क. — नावासकट फॉरवर्ड केलेला लेख हा विषयातील करिकेचे शेवटचे पद पूर्ण करेल , म्हणजेच नवग्रह प्रिय / इच्छित ते करतील .. शुभम् भवतु 😊