टेंबे स्वामी आरती2

श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

टेंब्येकुळी जन्मूनी होसी बहूगुणी
अत्रीगोत्री होउनी, होसी निर्गुणी
ज्योतिर्ज्ञानी होउनी कीर्ती पसरीसी
सार्थ वेदा जाणुनी शिष्य पढवीसी || १ ||

जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

शके सतराशे शहात्तर साली
श्रावणमासी वद्य षष्ठी शुभकाली
जन्मा येती वासूदेव या नामे
भक्ता उद्धाराया बहुविध यत्ने || २ ||
जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

शके अठराशे छत्तीससाली
आषाढातील शुद्ध प्रतिपदा दिवशी
नाशिवंतदेहा सोडुनि हो जासी
असंख्य भक्ता देउनि इच्छित हेतूसी || ३ ||
जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

शके अठराशे अडतीससाली
वैशाखातील शुद्ध द्वादशी दिवशी
सुंदरवाडीग्रामी राहाण्या इच्छूनी
गुप्तरूपे घेशी स्थान निर्मूनी || ४ ||
जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

साठी वर्षामाजी केल्या बहूलीला
वैदिकधर्मासाठी देह झिझविला
संन्यास घेऊनि धर्म रक्षीला
आत्मज्ञानमार्ग भक्ता दावीला || ५ ||
जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

जाणुनि आयुर्वेदा रोगा दवडीसी
योजुनि युक्तमंत्रा भूता बांधीसी
ऐशा अनन्तलीला वर्णू मी किती
बुद्धप्रेरक होउनि तूचि वर्णीसी || ६ ||
जय जय वासूदेवा जय दत्तात्रेया |
माणगावी जन्मुनी करिसी बहुलीला || ध्रु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!