वास्तुशांति सामान लिस्ट

— वास्तू शांती हवन सामान लिस्ट —

हळद , कुंकू , चंदन , अष्टगंध

समयी , निरांजन , दिव्यासाठी तेलाच्या तूपाच्या वाती – कापूस , माचीस

अगरबत्ती , धूप  , कापुर

पळी भांडे – फुलपात्र

घरातील गणपती मूर्ती – तांबे पितळ पंचधातु इत्यादीची

शंख , घंटी

वास्तू प्रतिमा , ध्रुव प्रतिमा , पंच रत्ने , सुवर्ण शलाका ( सोन्याची तार ) , 4 नाग
( वास्तू ध्रुव प्रतिमा सोन्याची – चांदीची – तांब्याची – पंचधातु ची वेगेरे जे शक्य असेल ते घ्यावे.. नाग मात्र चांदीचे घेतले तरी चालतील )
एक साधी मातीची पणती

पंचामृत वाटीभर ( दूध + दही + तूप + मध + साखर )

सुपाऱ्या – 12 छोट्या व 12 मोठया ( किंवा सर्वच मोठ्या सुपार्या )

8 ते 10 पत्रावळी , 2 ते 3 मोठी ताटे ,
5 ते 7 वाट्या किंवा पत्रावळीचे द्रोण , 2 – 3 पळी / चमचे , रद्दी पेपर

एक दोन स्टील चे भांडे ( निर्माल्य पाणी वैगेरे काढण्यासाठी )

घरातील फोटोना हार , दरवाजाला हार – तोरण – आंब्याची डहाळी , रांगोळी , पूजेसाठी सुद्धा आंब्याची पाने – डहाळी

गंगाजल , गोमूत्र , विड्याची पाने 35

21 हळकुंड , 21 अक्रोड , 21 खारीक , 21 लवंग , 21 वेलची

35 कॉइन्स – सुट्टे पैसे ( एक किंवा 2 रू चे  कॉइन्स ) , 10 रू च्या 12 नोटा , 50 च्या 4 नोटा , 100 च्या 4 नोटा

वेगवेगळी रंगीत फुले ( तेरडा नको ) , तुळशीपत्र , बेलपत्र , दुर्वा  , गजरे व वेण्या 2 – 3

बसण्यासाठी धुतलेल्या चादर / बेडशीट / आसन वैगेरे

हात पुसण्या साठी – देव पुसण्यासाठी – देवाची भांडी पुसण्यासाठी 2 ते 3 स्वच्छ धुतलेले किंवा नवीन नॅपकिन / वस्त्र / हातरुमाल

हाताला बांधायाचा नाडा – धागा ( लाल / पंचरंगी )  आणि जानवे जोड 3

चौरंग व पाट मिळून टोटल सहा – सात

देवासाठी / दानासाठी —> 2 – 3 ब्लॉउज पीस , एक पंचा –  उपरणे , एक टॉवेल , एक नॅपकिन ,
एक धोतर उपरणे किंवा शर्ट पॅन्ट पीस , एक् साडी ,

एक नवीन कलश व ताम्हण व पळीभांडे ( दान म्हणून ) जमल्यास शक्य असल्यास , कंपल्सरी नाही ..

8 फळे , 9 नारळ , 3 खोबरेवाट्या , 100 ग्राम गूळ , 100 ग्राम खडीसाखर

3 ते 4 तांब्या / पितळेचे कलश व 2 ते 3 ताम्हण

3 किलो गहू , 4 किलो बारीक तांदूळ , दीड किलो बारीक तांदूळ कणी / भगर

नवग्रहांची धान्ये प्रत्येकी 250 ग्राम वेगवेगळे पिशवीत पुडीत धान्य किंवा डाळी च्या स्वरूपात  (  –> तूर – मूग – मटकी – वाटाणा – चवळी – हरभरा – चणा डाळ – पांढरे तीळ – शेंगदाणे – रवा – साबुदाणा – साखर )

गायीचे तूप अर्धा पाऊण किलो

काळे तीळ अर्धा पाऊण किलो

शेणाच्या गोवऱ्या 4 – 5 शेण्या , हवना साठी इंधन म्हणून 3 किलो लाकडे , तसेच समिधाचे 6 बंडल

होम हवना साठी 10 – 15 विटा किंवा यज्ञपात्र हवन पात्र , आणि थोडी रेती / वाळू / माती

घर – जागा स्वच्छ करावी , गोमूत्र गंगाजल शिंपडावे , दरवाजाला हार तोरण लावावे , रांगोळी काढावी , घरातील देवाच्या फोटोना वैगेरे हार घालावे ,
पूजेच्या दिवशी उपवास असेल – उपवासासाठी फराळ म्हणून वेफर्स / राजगिरा चिकी – लाडू  वेगेरे आणावीत , पूजेच्या काही दिवस आधीपासून तसेच काही दिवस नंतर पर्यंत शाकाहार असावा , ( 21 दिवस आधी व नंतर ) ,
पूजेला बसणार्याने धुतलेले स्वच्छ वस्त्र धारण करावे ( काळा – लाल – हिरवा आदी भडक रंग नसावा  )


महत्वाचे या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ – प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना – सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद … 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!