घरात सुख शांती साठी

घरातील बाधा पिडा निवारण होऊन घरात सुख शांती समृद्धी साठी

एका योग्य दिवशी सकाळी स्नानानंतर शुचिर्भूत होऊन आनंदी मनाने देवपूजा करून हातात पांढरी किंवा पिवळी मोहरी घेणे. ती सुद्धा मिळाली नाही तर घरातील नेहमीची काळी मोहरी घेऊ शकतात ..

देवाला धूप दीप लावून त्रास बाधा निवारण साठी प्रार्थना करणे ..

मोहरी हातात घेऊन 21 वेळ खाली दिलेले मंत्र म्हणून सर्व घरात जागेत कोपऱ्या कोपऱ्यात त्या मोहरीचे चार चार पाच पाच दाणे टाकणे .. खिडकीत , उंबरठ्यावर पण टाकणे … टाकताना शिव शंकराचे जप नामस्मरण करणे ..
खालील मंत्राबरोबर शिवकवच स्तोत्र किंवा देवीकवच स्तोत्र वगैरे वाचले तर उत्तम. तसेच 108 वेळा शिव मंत्र जप किंवा मृत्युंजय जप केला तर अजून उत्तम ..

मंत्र —

अपसर्पन्तु ते भूता: ये भूता:भूमि संस्थिता:।
ये भूता: विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु शिवाज्ञया ॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम ।
सर्वेषामविरोधेन गृह सौख्य अभिवृद्धये ॥

दर महिन्यातून एकदा करू शकतात .. मोहरी पायाखाली आली , घर साफ करताना झाडली गेली तरी काही दोष नाही …

तसेच मोहरी ऐवजी देशी गावठी गोमातेचे शेणाचे भस्म किंवा हळद घेऊन किंवा गंगाजल गोमूत्र एकत्र पाण्यात टाकून ते पाणी घेऊन सुद्धा हा उपाय तोडगा करू शकतात. एखादेवेळेस मोहरी एखादेवेळेस भस्म किंवा हळद असे वापरले तरी चालेल ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!