भद्रा दोष

भद्रा ही पौर्णिमेला असतेच असते .. फक्त कालावधी वेगवेगळा असू शकतो .. आता पर्यंत अनेक वर्ष हे चालू आहे परंतु सध्या काही व्यक्तिंद्वारे धार्मिक विषयात , सण उत्सव मध्ये विनाकारण काही ना काही नियम व त्यामुळे होणारे दोष त्रास सांगुन जनमानसात समाजात भीती दाखवली जात आहे , किंवा संभ्रम निर्माण केला जात आहे … खरेतर या नियमांना स्थळ – प्रांत – गोत्र शाखा – पूर्वापार पद्धती वगैरे वगैरे यातील भेदामुळे काही उपनियम – पर्याय सुद्धा असतात व त्या उपनियमांमुळे दोष त्रास यांना बाध येत असतो म्हणजेच ते नियम सौम्य होऊन दोषकारक राहत नाहीत.. तरीसुद्धा असे अर्धे नियम प्रसारित करणाऱ्यांच्या मनात काय शिजत आहे हे सांगता येत नाही , पण हे चूक आहे – अयोग्य आहे हे मात्र नक्की ..

सध्या रक्षाबंधन व भद्रा अशुभ काल हा विषय चालू आहे त्यावर शास्त्रीय दृष्टीने काही नियम उपनियम ..

कुंभकर्कद्वये मयेऽब्जे स्वर्गेऽजात्त्रयेऽलिगे स्त्रीधनुर्जूकनकेऽधो भद्रा तत्रैव तत्फलम् ॥ ०० ॥

जेव्हां भद्रेचा काल असेल, तेव्हां कुंभ, मीन, कर्क व सिंह या राशींत चंद्र असल्यास ती भद्रा मृत्युलोकीं आहे असे समजावें. मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असल्यास ती भद्रा  स्वर्गलोकीं आहे असे समजावें. आणि कन्या, धनु, तूळ व मकर या राशीत चंद्र असल्यास ती भद्रा पाताळांत आहे असे समजावें, भद्रा जेथे असेल तेथे तिचे फल मिळेल.
या नुसार 11 तारखेला चंद्र मकर राशीत आहे मग तिचे अशुभ हे फल पाताळात आहे भूमीवर नाही …

रात्रिभद्रा यदान्हि स्याद्दिवाभद्रा यदानिशि ।
न तत्र भद्रा दोषः स्यात्सा भद्रा भद्रदायिनी।।

जर भद्रा दिवसा सुरू होईल व रात्री सुद्धा असेल किंवा भद्रा रात्री सुरू होऊन दिवसा सूद्धा असेल तर ति भद्रा दोषकारक नसून शुभकारक होय … सूर्य असताना सुरू झालेली भद्रा चंद्र असताना संपली किंवा चंद्र असताना सुरू झालेली भद्रा सूर्य असताना संपली तर तिचा दोष नाही …

मुहूर्त चिन्तामणि टीका , ज्यो पियुषधारा ०० , ब्रह्मयामल , मुहूर्त गणपति …..

यानुसार 11 तरिखला भद्रा दोष नाही …

दिवा परार्धजा विष्टि: पूर्वार्धौत्था यदा निशि ।
तदा विष्टि: शुभायेति कमलासन भाषितम्।।
दिवसा असलेली विष्टि आदल्या रात्री सुरू झाली असेल किंवा त्याउलट जरी असेल तर ती शुभदायक असून कमलावर असलेल्या देविप्रमाणे आनंददायक असते..

लल्लाचार्य शु शु प्र चिन्तामणि टीका , गोविन्दाचार्य रत्नमाला टीका ….

मकरेस्थ भद्रा पाताले भुम्यांधनापगामिनी …. म्हणजेच मकरेतील भद्रा पाताळात असून पृथ्वीवर धनदायक असते. हा सुध्दा उल्लेख आहे .. दैवज्ञ गणपती – करण प्रकरण ..

वरील काही नियम पाहता 11 तारीखला असणारे रक्षाबंधन आपण कोणतीही शंका कुशंका भीती मनात न ठेवता पूर्ण आनंदाने व प्रसन्न मनाने साजरी करावी .. इतरांच्या कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नये .. अगदीच तरी सुद्धा काही भीती वाटत असेल तर खालील उपाय योजना करावी ..

भद्रा दोष निवारण उपाय

एका छोट्या काळ्या कपड्यावर एक लोखंडाची वस्तू ( खिळा टाचणी छरा वगैरे ) घेणे .. हातात अक्षता घेऊन
” *ॐ श्री भद्रायै नमः ध्यायामि चिन्तयामि पूजयामि*” 
असे म्हणावे व अक्षता अर्पण कराव्या. नंतर
ॐ श्री भद्रायै नमः ” असे म्हणत चंदन , हळद , कुंकू , शेंदूर वगैरे अर्पण करणे. धूप दीप ओवळणे. प्रसाद म्हणून साखर / गूळ / साखर फुटाणे / मनुका वगैरे अर्पण करणे. व अशुभ न होण्याची प्रार्थना करत खालील मंत्र म्हणणे ..

छाया सूर्य सुते देवि विष्टिरिष्टार्थदायिनी । पूजितासि यथाशक्त्या भदे भद्रप्रदा भव ॥

भद्रा शुभ होण्यासाठी ही 12 नावे म्हणून भद्रे ची प्रार्थना करणे तसेच शिव शंकर व विष्णूचे नामस्मरण प्रार्थना करने म्हणजे भद्रा दोष लागत नाही ..

धन्या दधिमुखी भद्रा महामारी खरानना। कालरात्रिर्महारुद्रा विष्टिस्च कुल पुत्रिका ।। भैरवी च महाकाली असुराणां क्षयंकरी । द्वादशैव तु नामानि प्रातरुत्थाय यः पठेत्।।

नंतर देवाला भावाला राखी बांधून झाल्यावर तो काळा कपडा लोखंडी वस्तू व फुलं प्रसाद वगैरे सर्व पाण्यात विसर्जन करणे. पाण्यात शक्य नसेल तर एका मोठ्या झाडाखाली मातीत विसर्जन करणे ..
भविष्य पुराण उ पर्व (०००-००)

॔॔॓©® सन्शोधक लेखक — श्री श्याम जोशी गुरुजी , टिटवाळा , मुम्बई …. क्रुपया महत्प्रयासाने शोधुन लेखन करनार्या खर्या लेखकाचे नाव खोडू नका .. श्लोक नम्बर मुद्दमुन टाकले नाहीत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!