मंत्र mantra

मंत्र म्हणजे अक्षर समूहाचे शब्दाचे विशिष्ट उच्चार होय .. यांच्या उच्चाराने नादाने एक विशिष्ट ऊर्जा तयार होऊन आजूबाजूच्या वातावरणा मधील ऋण ऊर्जा , घातक तत्वे नष्ट होऊन धन प्रभावी ऊर्जा तयार होते.. मंत्रांमुळे देह मन चित्त व आजूबाजूचे वातावरण शुद्ध प्रसन्न होते. 

परंतु स्तोत्र मंत्र हे गायल्या सारखे म्हणू नयेत , तसेच ते कोणत्याही इतर नादाशिवाय असावेत आणि मंत्राबरोबर नाद असलाच तर त्याला योग्य व उचित नाद व वाद्ये असावीत असे शास्त्र सांगते .. म्हणजेच कोणतेही इतर वाद्यांचे संगीत त्यात नसावेत ..  शिव देवतेला झांज / टाळ , सूर्य देवतेला शंख आणि देवीला बासरी वर्ज्य आहे म्हणजेच या देवतांच्या मंदिरात किंवा मंत्र पुजना मध्ये ही वाद्ये वाजवू नयेत .. परंतु आजकाल सर्रास अनेक वाद्ये सर्वत्र वाजवली जातात .. जवळपास 95 टक्के मंत्र स्तोत्र ऑडियो हे अनेक वाद्यांचा उपयोग करून संगीतमय असतात , आणि म्हणूनच खरेतर या मंत्र स्तोत्र श्रवणाचा म्हणावा तसा उपयोग होत नाही म्हणजेच फलप्राप्ती होत नाही .. 

म्हणूनच मी आपणासमोर एकदम शुद्ध व संगीत वाद्य विरहित असे शुद्ध स्तोत्र मंत्र स्वतःच्या आवाजात युट्यूब वर घेऊन येत आहे .. हे मंत्र ऐकताना तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष समोर ऐकत आहात किंवा आपल्या घरातच मंत्र उच्चार पूजन चालले आहे असेच वाटेल व ऊर्जामय प्राणशक्ती जागृत होण्यास मदत होईल .. 

तसेच ते स्तोत्र मंत्र रोज आपणाला म्हणायचे असेल तर त्याचे लिखित स्वरूप सुध्दा व्हिडिओ मध्ये दिले आहे , म्हणजे आपणाला व्हिडिओ बघून वाचता येईल व माझ्या बरोबर स्वतः म्हणता येईल .. 

खालील लिंक क्लिक केल्यावर युट्यूब स्तोत्र मंत्र विभागात जाता येईल.

https://youtube.com/playlist?list=PLMLyx4FBBEBoPDqSKpdytdV9NHZ9iKl5V

कृपया चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करावे म्हणजे मला सुध्दा आपल्या शुभेच्छा मिळून अजून चांगले उपयोगी सत्कार्य करण्यास उत्साह स्फूर्ती येईल आणि आपल्याला वेळोवेळी शास्त्रशुद्ध व उपयुक्त स्तोत्र मंत्र अपडेट मिळत राहील. मनस्वी धन्यवाद …

श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!